Posts

Showing posts from May, 2013

खेळ शब्दांचा !

Image
इतक्यातली नवीन गोष्ट म्हणजे मी इथे ये ऊ न मराठी लिटरेचरची खूप मोठी ‘ फ्यान ’ झाली आहे .  मराठी तारकांची तर आधी पासून होतीच पण आता तर साहित्याची पण झाली आहे .  इतकं सुंदर लिहून ठेवलय लोकांनी आणि ते पण अगदी साध्या शब्दांत .  आता पु . ल . देशपांडें चच बघा ना .  भावनांची किती सहजतेनी मांडणी करतात ते .  किती अभ्यास !  पुस्तकी नव्हे ,  तो तर त्यांचा होताच ,  लोकांचा अभ्यास ,  त्यांच्या भावनांचा ,  त्यांच्या स्वभावाचा !  शब्दांचा कसला कठीण अर्थ नाही ,  आहे तो फक्त शब्दांचा खे ळ !  जड जड शब्द वापरून तर कोणी पण लिहितं ,  पण तेच जर कठीण भावना सर ळ  सोप्या शब्दांत लिहा म्हंटलं तर ते किती जड जातं !  आणि पु . ल .  ते किती सहजतेने करतात !  एका क्षणात हसवणं आणि एका क्षणांत रडवणं इतकं सफार्इदारपणे करतात की एका क्षणापुर्वी गालातल्या गालात हसणारे आपण असे कसे डो ळे  टिपून राहिलो आहोत किंवा इतके गंभीर कधी झालो क ळ तच नाही !  खरच ,  असे लेखक आपल्या डो ळ यांसमोर एक जगच उभं करतात .  अगदी ज...