सहजच !




आत्ता सुचतय अगदी सहजच, विनाकारण अगदी अचानकच.
कशावर लिहितेय नाही सांगत, वाचल्यावर कळेल लगेचच.

सुखानंतर दु:ख किंवा दु:खानंतर सुख नसतं कधी सहजच,

प्रत्येक परिस्तितीला समोर जाण्यास तयार करतं ते नकळतच.

यश अपयश असतात एकाच नाण्याच्या दोन बाजू,

या नाण्याला सांभाळून ठेवणं अवघडच.

दिवस उजाडतो नि मावळतो, आपल्याला हुशार करण्यासच.

प्रेम नि मैत्री दोन्ही सारखेच कारण आपण हे करतो आपल्या माणसावरच.

जरा विचार केलास तर हेही पटेल तुला आपण नाही जन्मलो उगाचच.


Comments

Popular posts from this blog

Don’t know why!

Go and Live Your Life They Said!

Odd Connect!