आभास प्रेमाचा !
प्रेम म्हणजे नक्की काय हो ?
फक्तं मनाचे खेळ ?
एकमेकांना बघून चाललेली मनातली चलबिचल की
शब्दांशिवाय चाललेली डोळ्यांची तगमग ?
एकमेकांना दोन मिनिट बघण्याची गडबड की
सगळं काही सांगायला चाललेली एकमेकांमधली चढाओढ ?
मेसेजचा रिप्लाय येई पर्यंत होणारी चिडचिड की
कसं सांगू या विचारांनी झालेली मनाची हुरहूर ?
जुनं नातं खराब होईल म्हणून जाणून बुजून केलेली टाळाटाळ की
एकदा सांगून तं बघू हा विचार करून असलेला एकमेकांबद्दलचा विश्वास ?
काही होवो प्रेम म्हणजे सोबत राहण्याचा एक अट्टाहास.
तसेच शब्दांपली कडला एक सुखद आभास !
Comments
Post a Comment