मनापासून पुन्हा एकदा !
Had written this Marathi article for my newspaper after almost two years.
Date: November 29, 2012
आपली भेट जवळपास एक वर्षाने होतेय. कॉलेज आणि करिअरच्या चक्रव्हयू मध्ये मी कधी आणि कशी अडकले कळलेच नाही. खरं सांगायचं झालं तर मला शेवटचा लिहिलेला लेख देखील आठवत नाही. आठवडयातून तीन लेख, मग दोन, मग एक, मग महिन्यातून एक, मग फक्त स्पेशल एपिसोड करत करत फक्त काही पुरवण्यांची बांधणी आणि मग एकदम फुल स्टौप असा काहीसा क्रम मात्र आठवतो.
माझी टीमशी चार वर्षांची ओळख जेवढी आकस्मित तेवढीच अविस्मरणीय आहे. “वाचलेले आर्टिकल आवडले, काही चांगले विषय माझ्याकडे आहेत, मेल करू का” विचारणे काय, एका मिटींगला गेली काय आणि टीमची झाली काय! सगळंच एकदम थ्रिलिंग वाटलं होतं सुरवातीला. आणि हो, जाम सटारली पण होती. कारण एकतं एवढया प्रख्यात वर्तमानपत्रात लिहायचं आणि तेही मराठीत! सवय नाही की सोबतीला तगडा असा मराठी शब्दसंच वा अनुभव नाही. बापरे! कठीणच! पण हळूहळू कळले की हा तर एक संवाद आहे, लाखों का एक की जुबानी. प्रत्येकाची स्टार्इल वेगळी, टेक वेगळा आणि विषयही वेगळाच.
सुरवातीला मी युथपेजचे काही कॉलम सांभाळले. नंतर आकांशा आणि मग जस जशी टीमची कामं वाढली तेवढा व्यापही वाढला. “अरे आज पुरवणीचा वार” म्हणून आठवडयातील दिवस मोजणे सुरू झालं आणि आज कशी प्रतिक्रिया येर्इल याचे अनुमान बांधणे सुरू असायचं. काही म्हणा तुम्हा सर्व वाचकांचे भन्नाट कमेंट्स ऐकायची उत्सुकता आणि समाधान पुर्ण दिवस मस्त जायला भारीच मदत व्हायची. आज खरच तुमच्यामुळे ही टिम फुलली.
लिहिणं अगदी नित्यकर्म झालं होतं. आर्टिकल अर्जंट आहे म्हणून कित्येक रात्र, कॉलेजचे लेक्चर्स, फंक्शन्संना डिच करण्यात आले. त्यासाठी सगळ्यांना “सॉरी”, पण त्यावेळी ती प्रायाओरिटी होती. मित्रांचे “ये भेटायला” “जर थोडा वेळ असेल तर येऊन जात जा एखादवेळी” बघता बघता कन्व्हर्ट झाले. बट इट्स ओके. आय डोन्ट ह्याव्ह एनी रिग्रोट्स अबौट दैट. त्यावेळी जे वाटलं ते मी केलं. कारण मला टिमने आत्मविश्वास तर दिलाच पण टुडे आय नो अपटु व्हॉट लिमिट्स आय कॅन स्ट्रेच मायसेल्फ. आणि हो, “टिम फ्रेंड्स” या नवीन कॅटेगिरीतली मस्त लोकं मिळालीत.
यातून निसटता पाय घेणं खरच खूप कठीण होतं; पण काय करणार सध्या करीअर ही प्रायाओरिटी असल्यामुळे हे करावं लागलं. असं तर आता पुढे पण राहणार आहेच. लिखाण हा फुल टार्इम जॉब कधीच नव्हता मग तरीही सांभाळू शकले नाही? बडमिंटन, कॉलेजचे स्पोट्र्स, फेस्टिव्हल्स, सेमिनार, टूर, परीक्षा सगळं सांभाळून इतके दिवस सगळं बरोबर सांभाळलं मग याच वर्षात नसतं जमलं हे मला? काही दिवसांपुर्वीचा “हा मस्त टोपिक दिसतोय चला काहीतरी तोड लिहू” हा पावित्रा आज फक्त “रिझ्यूम मध्ये टाकला जाणारा एक एक्स्ट्रा करिक्युलर पोर्इंट” झालाय! खूप खंत वाटते या गोष्टीची.
म्हणून आज आता पुन्हा एकदा लिहिणे इज अ मोर दान अ वेलकम थौट. लिहित नव्हते म्हणून काय झालं, कित्येक विचार येत होते, पण ते शब्द अक्षरात कधीच उमटले नाहीत. असो! आज मी लिहितेय, कित्येक शब्दांचा अबोला संपवतेय! जे जसं मनात येर्इल ते टिपतेय.
माझं नुकतच इंजिनिअरिंग झालं, “तर मग आता पुढे काय” हा प्रश्न मला हमखास विचारल्या जातो. माझी वाट ठरलेली आहे म्हणून माझं उत्तर पण. पण ज्यांच्या हातात कमी आपश्नस् आहेत त्यांचं काय होत असेल या प्रश्नाचं उत्तर देताना कोण जाणे. कॉलेजमध्ये असे पर्यंत किती सुरक्षित असतोना आपण, नाही का? कशाची चिंता नाही की जबाबदारी नाही. संपूर्ण दिवसाचा आणि अश्या कित्येक दिवसांचा आराखडा असा तयार असतो आणि सगळ्यत ग्रेट गोष्ट म्हणजे तो आराखडा आपण नसतो बनवलेला! एकदम फ्री आणि बिनधास्त असतो आपण; पण ज्या क्षणी आपण तिथून बाहेर पडतो तेव्हा सगळं अचानक नाहीसं झाल्याचा भास होतो. शेवटचा रिझल्ट लागताच विद्यार्थी चे माजी विद्यार्थी होतो. सगळं परिवर्तन कसं एका क्षणात होतं. तो जुना आराखडा एका क्षणात उपयोगात येणारा नसतो आणि आता येणाऱ्या सगळयाच प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच शोधायची असतात. यालाच मेबी “मोठं होणं” म्हणतात.
ज्यांच्या वाटा ठरलेल्या असतात ते बरोबर वाटेवर लागतात, पण ज्यांच्या नसतात त्यांचं काय? दे हैव्ह टु स्टार्ट फ्रॉम द सक्राच. बरेच प्रयोग केले जातात. काही फसतात तर काही एकदम स्ट्रार्इक होतात. आपले स्वप्न साकारण्याची ही एक प्रोसेस आहे जी ज्याची त्यानेच ठरवावी. जास्तीत जास्त काय, होतील चुका, लागेल ठेच, पण यातूनच शिकता येर्इल ना?
गेल्या काही महिन्यात अशा या टर्निंग पोइन्त वर माझी अनेक लोकांशी ओळख झाली. एक गोष्ट प्रकर्षाने जी जाणवली ती म्हणजे, गरज असताना बरेच लोक मदतीला धावून येतात, यू ह्याव्ह टू जस्ट आस्क! सगळे म्हणतात की दुनिया खूप स्वार्थी आहेत वगैरे वगैरे, पण यू ह्याव्ह टू जस्ट स्ट्रार्इक द रार्इट कॉर्ड. आहेत, जेन्युन माणसं खरच आहेत. “व्हेन इन डाऊट, आस्क; व्हेन यू ह्याव्ह नो आयडिया, आस्क; व्हाटएव्हर, हाऊएव्हर मार्इट बी द क्वेश्चन, जस्ट आस्क!”
आपले स्वप्न पुर्ण करताना आपल्याला अनेक प्रश्न विचारले जातात, पण कधी कधी काही प्रश्नांची उत्तरे नसतात हे लक्षात ठेवलं तर चांगलच. हे ही लक्षात ठेवावं की प्लान प्रमाणे सगळं झालं असतं तर आज सगळं जग वेगळं असतं, सो गेट युज्ड टू ऑफ प्लान्स चेंजिंग, कारण जे होतं ते चांगल्या साठीच होतं. यातच तर खरी मजा आहे. एक्सपिरिअन्स इट अन्ड मूव्ह ऑन!
नवीन लोकं, नवीन शब्द, नवीन विचार आणि नवीन अनुभव! सारच काही नवीन अनुभवलं. एकदम म्याच्युअर झाल्यासारखं वाटलं. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मला माझी हरवून विसरलेली कप्याबिलिटी आणि एक्सट्रिमिटी पुन्हा सापडली. बरेच अम्बिशिअस लोकं पण भेटलीत. त्यांना बघून कळतं की आयुष्य म्हणजे जॉब, लग्न, संसार फक्त एवढेच नसून खरच खूप अफाट आहे. आपण फक्त मोठा विचार करत नाही; कदाचित करतही असू मात्र, तो रिएलिटी मध्ये आणायला घाबरत असू. खरच स्वप्नांना आपण इतकं मर्यादित ठेवलय का?
जितके मी अम्बिशिअस लोकं बघितलीत त्यांच्या दुप्पट अनअम्बिशिअस लोकं बघितलीत. बेसिक शिक्षण झालं, जॉब लागला, बस झालं? पुढचं काय? आय मिन पथेटिक! स्वत: करता काय केलं? एवढयाश्यात समाधानी झाले? मला माहिती आहे हे प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून असतं; पण तरीही, सिरिअसली फक्त हे करणार आपण आयुष्यात? आधीच तर फक्त एकदाच जगतो आपण आणि एवढं न्यारो मान्इडेड? लोकं म्हणतात, “हमारे बस की बात नही”. अरे पण कधी स्वत:ला टेस्ट केलं का? स्वत:ला कधी प्रश्न विचारलेत का? प्रयत्न करण्याआधीच हात टेकलेत?
वल्र्ड इज अ व्हेरी जनरस प्लेस, प्रयत्न तर करा, मग कळेल. कदाचित यात तुमचे सगळे बिलिफ़स देखील ढवळून निघतील, पण काय हरकत आहे? एकदा नाण्याची दुसरी बाजू बघून कदाचित एखादा वेगळी दॄष्टीकोन मिळेल. काय चूक काय बरोबर हे पण कळेल. फक्त स्वत:ला एक संधी दयायला काय हरकत आहे? मग काय, बसणार ना या रोलर कोस्टर रार्इड वर?
Comments
Post a Comment