कोण जबाबदार? सरकार? च्छेऽ हो! आपणच!
This is one of the cover stories which we did for a special issue somewhere around the time when the scams like "Adarsh", 2G and 3G came into picture. Our main theme was about the black money stored in the Swiss banks and corruption in general. In this article, ways to spend this black money are being discussed. February 10, 2011 देशात काहीही वार्इट घडले की आपण सरकारला जबाबदार ठरवून मोकळे होऊन जातो . शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असो वा कांदा महागला असो , नक्षलवाद्यांचा प्रश्न असो वा सुरक्षिततेचा , तेल गळती असो वा पेट्रोलचा प्रश्न असो , कोणताही राजकीय प्रश्न असेल वा अत्यंत साधा प्रश्न , सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच , सरकार! ठीक आहे ना , असेल सरकार दोषी , आहेच . पण आपला पण तेवढाच दोष नाही का ? आपणच तर निवडून देतो या नेत्यांना . त्यांनी दिलेली वचनं पूर्ण करावी ही अपेक्षा करणं हे चुकीचे का ? जर त्यांनी दिलेली वचनं पूर्ण नाही केलीत तर पुन्हा एक ‘आदर्श’ होर्इ पर्...