एक अनोखी मुलाखत!
This might be one of my oldest write up. First ever interview taken. Of one of the employees of the Tarun Bharat newspaper. Fresh after giving the standard 10 boards, when had loads and loads of time, had attended this camp in the summer of 2006. I remember this camp! It was a great fun. I learnt not to say 'a' while public speaking! Everyone used to count when any one of us made that mistake. I remember, we had to present a play too! Well, have no idea which role I played and what the play was, but remember that, it was seriously a nice experience! We got to see the newspaper printing process, all those huge printing machines and met some exciting people! This one indeed need a place on the blog!
Date - 2006
मी तरूण भारत चे नाट्य शिबिर केले. संजय पेंडसे काकांनी हे शिबिर योजिले होते. या शिबिरात सर्व शिबिरार्थींना तरूण भारत मधील एका कर्मचाऱ्याची मुलाखत घ्या हे सांगण्यात आले होते. तेव्हा मी घेतलेली मुलाखत.
मी : सर आपलं नाव काय आहे?
सर : मी दिनकरराव देशमुख.
मी : आपण इथे काय करता?
सर : मी इथे एक प्रसारव्यवस्थापक म्हणून काम करतो.
मी : म्हणजे तुम्ही नेमकं काय करता?
सर : तरूण भारत हा पेपर चंद्रपूर, भंडारा, अमरावती, गडचिरोली आणि नागपूर या ठिकाणांहून छापल्या जातो. आमचे सगळया ठिकाणी 550 एजंट आहेत. ते आम्हाला बातम्या देतात. माझं नेमकं काम आहे पेपर्सचं बंडलिंग. त्याची नीट व्यवस्था बघण, मोठ्या सरांच्या डोळ्यांखालून नेणे आणि मग ते सगळ्यांना वाटणे. आम्ही बाहेरगावी पेपर पाठविण्यासाठी एस टी चा वापर करतो.
मी : मग आपण ट्रेनचा देखील वापर करत असाल?
सर : हो. पण जास्त करून आम्ही एस टी चाच वापर करतो. जी गावं रेल्वे रुळावर आहेत त्यांना आम्ही ट्रेनने पाठवतो. पण फार कमी.
मी : आपण विमानाचा देखील वापर करता का?
सर : नाही. ते फार महागात पडतं.
मी : आपला हा पेपर कुठे कुठे जातो?
सर : हा पेपर विदर्भ पूर्ण, मराठवाडा, गुजरात, एम पी, ए पी चा काही भाग, कर्नाटकचा काही भाग या ठिकाणी जातो. हा पेपर आसाम, दिसपूर येथे जातो पण त्यांना तीन दिवस आधीचा पेपर मिळतो. हा पेपर दिल्लीला कुरियरने जातो. अटलजीं पर्यंत हा पेपर जातो.
मी : आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अटलजी हे हिंदी भाषिक आहेत. तर ते हा मराठी पेपर वाचतात का?
सर : हो नक्कीच.
मी : आपला हा पेपर इतर पेपर जसे लोकमत, सकाळ, देशोन्नती पेक्षा कसा वेगळा आहे, याच्यात असं काय आहे जे या पेपरला वेगळं बनवतं?
सर : तरूण भारतचं जे संपादकीय पान आहे ते उत्तम आहे. लोकांच्या प्रातिक्रियांचं पान देखील उत्तम आहे. यात उत्तम लेख आहेत आणि त्यामुळे तरूण भारत हा वेगळा आहे.
मी : आपण नेमकं कसं ठरवता की हा लेख प्रथम पानावर हा तिसऱ्या पानावर आणि हा शेवटच्या?
सर : ते घटनां वर अवलंबून आहे. तुम्हाला याची जास्त माहिती संपादक विभागातून मिळेल.
मी : इतर पेपर्सच्या तुलनेत या पेपरमधे पृष्ठभाग फक्त आठच आहेत आणि इतर पेपर्समधे जास्त आहेत. तर असं म्हणता येर्इल का या पेपर मधे इतर पेपरपेक्षा कमी बातम्या छापल्या जातात.
सर : हे निश्चितच बरोबर आहे. आम्हाला एक मर्यादा आहे म्हणून आम्ही ही पानं वाढवू शकत नाही.
मी : हा पेपर अजून चांगला व्हावा म्हणून आपल्या काही योजना आहेत का?
सर : सध्या तर नाही. पण या पेपरचं प्रिंट थोडं फेंट आहे ते आम्ही थोडं चांगलं डार्क करतो आहोत आणि पेपरचं प्रोझेंटेशन थोडं बदलतो आहोत.
मी : आपण पेपरची किंमत कशी ठरवता की हा पेपर 2.30 रू आणि हा 3 रू?
सर : 1992 पासून पेपरची किंमत हीच आहे. ती बदलली नाही आहे. सामान्य माणसाची मानसिकता अशी आहे की ते कमी किमतीच्या वस्तू जास्त घेतात. स्पर्धा असल्यामुळे आम्ही किंमत वाढवू शकत नाही.
मी : आजकाल इंग्रजी वर्तमानपत्र देखील वाढले आहेत तर आपला हा मराठी पेपर खपल्या जातो का?
सर : इंग्रजी वर्तमानपत्र वाचणारे फार कमी असतात. गावात वगैरे मराठी पेपर जास्त वाचल्या जातो. म्हणून हा मराठी पेपर नक्कीच वाचल्या जातो.
मी : बातम्या मिळविण्यासाठी तुमचे प्रातिनिधी जागो जागी फिरत असतात का?
सर : प्रात्येक जिल्हयात आमचे दोन तीन कार्यालयं आहेत. तेथे लोक बातम्या पोहचवतात. आमचे प्रातिनिधी देखील फिरत असतात. त्या सगळया बातम्या मिळवून त्या जिल्हयातील बातम्या ते आम्हाला मोडेमने पाठवतात.
सरांनी मला प्राश्न विचारायला सुरवात केली. तुझे बाबा काय करतात, तू कुठे राहते, तुमच्या घरी कोणते पेपर येतात वगैरे. मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे तरूण भारत आणि हितवाद येतो. तरूण भारत खूप वर्षांपासून येतो.
सरांनी स्वत:हून काही सांगितलं :
आम्ही वेगवेगळया पुरवण्या काढतो. मुलांसाठी स्पंदन, युवांसाठी मध्यमा, महिलांसाठी आकांशा आणि वॄध्दांसाठी आसमंत. हा पेपर सगळयांसाठी आहे. आसमंत आमची जी पुरवणी आहे ती अगदी उत्कृष्ट अशी आहे. आम्ही दिवाळी अंकही प्राकाशित करतो. (तरूण भारत आणि स्पंदनचे दिवाळी अंक त्यांनी मला दाखवले).
मी : आपलं जे सुप्राभात पान आहे ज्याच्यात आपण संस्कृत सुभाषितं देत होतात ते बंद का झाले?
सर : हे आपण संपादकांनाच विचारा.
मी : मला आपल्या पेपरचं प्रिांटिंग कसं होतं ते बघायचं आहे म्हणजे आपण जो पेपर रोज घरी वाचतो तो नेमका कसा तयार होतो हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.
सरांनी मला त्यांचा फोन नंबर दिला आणि मला फोन कारून तुम्ही कधीही प्रिांटिंग बघू शकता असं सांगितलं.
मी : धन्यवाद सर. माझ्याकडून काही चुकलं असेल आणि तुम्हाला त्रास झाला असेल तर क्षमा असावी म्हणून मी बाहेर आले आणि शिबिरामधे परतले.
Comments
Post a Comment