ए बी सी डी मैत्रीची !
Friendship Day Special Issue 2010
शिंपल्यात पाणी घालून समुद्र कधी दाखवता येत नाही,
हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही,
निळ्याभोर गगनाचा अंत कधी होत नाही, अन्
नाजूक अशा मैत्रीचा उल्लेख शब्दात होत नाही.
यारी, दोस्ती, मित्र, मैत्रिणी यांच्यावर असे अनेक काव्य, कथा एवढच काय तर चित्रपट देखील आहेत. याच संदर्भाचे असे असंख्य एस एम एस पण रोज येतात आणि मैत्रीदिनाला तर यांची उधाणच असते. अगदी आपलं ज्यांच्यासोबत कोल्ड वॉर असतं ते पण मेसेज पाठवतात. हे सगळं तर ठीक आहे पण एक गोष्ट सांगा दोस्तहो साला चीज क्या है ये दोस्ती? याचा नेमका अर्थ प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार लावतो.
खरंतर मैत्रीची परिभाषा आपल्या वयानुसार बदलत जाते. आपण अगदी लहान असतो तेव्हा आपली आर्इ आपली पहिली मैत्रीण होते. आर्इसोबतच घरातील सगळेच म्हणजे बाबा, आजी, आजोबा, काका, काकू सगळेच मित्र बनतात. मग जस जसं आपण मोठं होतो शाळेत जाऊ लागतो आपले मित्र होतात आणि मग सुरू होते ही मैत्रीची गाथा. यात रूसवे फुगवे सब चलता है आणि ‘नो सॉरी नो थँक्स’ हा मुळ सिध्दांत. लहाणपणीची मैत्री ही अगदी निरागस. यात इगो जेलसी स्पर्धा काही नसतं असते फक्त एक जेन्युन सोबत. मैत्रीची पहिली खरी कसोटी असते ती 10वी 12वी नंतर. कारण यानंतर सगळेच आपापल्या वाटांकडे वळायला लागतात. सगळ्यांनाच आपल्या करियरचा प्रश्न पडतो आणि याच गडबडीत कुठेतरी जुने मित्र हरवल्यासारखे होतात. पण याचा अर्थ असा नाही की ते मित्र राहत नाहीत ते फक्त आऊट ऑफ फोकस होतात आणि नवीन जग नवीन मित्र फोकस होतात.
मग पुढे कॉलेज मधे नवे सोबती मिळतात. आपली सगळ्यांशीच अक्वनटनशिप असते पण आपले मित्र कमी बनतात. कारण एकच आपण सगळे माच्युअर होतो आणि ज्याच्याशी जमेल त्याच्याशीच मैत्री करतो. आपण नकळतच सगळ्यांना ‘क्वालिटी आणि क्वान्टिटी’ च्या तराजूत मापू लागतो. याच काळात आपल्याला घनिष्ठ मित्र पण मिळतात कारण मैत्रीत लिंग, जात, धर्म, वय, भाषा यांना स्थान नाही. जिथे मैत्रीचा ओलावा मिळतो तिथे मैत्री होऊन जाते.
पुन्हा प्रश्न आहेच मैत्री म्हणजे काय. मित्र म्हणाला माझ्याकरता जीव दे तर तो देणं की त्याच्या मुस्काटात मारून त्याला म्हणणं ‘बे साल्या मी मेलो तर तुझं कसं होणार?’ मित्राचा पेपर बाक आला तर मी पण कंपनी देतो म्हणणं की मित्राची मदत करून तो क्लिअर करवणं? मित्र चुकत असेल तर त्याला त्यात अजून ढकलणं की त्यातून बाहेर काढणं? रोजचे हँगओव्हर, पार्टीज, नार्इट आऊट्स किंवा रोज एक एस एम एस फॉरवर्ड करणं म्हणजेच मैत्री? नाही ना? मैत्री म्हणजे एक सुखद आधार! आपला आनंद दु:ख फ्रस्ट्रेशन शेअर करायला एक हक्काचा माणूस! पुढे आपले हे मित्र आपलं विश्व बनत जातात आणि नकळतच घरचे आणि नातेवार्इकांचे संबंध थोडे ताणले जातात. प्रत्येकानेच घरी ‘थोडं घरी पण रहात जा’ हे वाक्य हमखास ऐकलच असेल! ‘आत्ताच तर भेटला होतात अजून कितीदा भेटणार आणि इतकं काय बोलायचं असतं सदैव फोन तर असतोच हातात’ हे त्यानंतरचे वाक्य! आपल्याला हे सगळं कळत नाही यातला भाग नाही पण काय करणार?
कॉलेज संपल्यावर नोकरीच्या निमित्ताने पुन्हा दुर जाण्याची वेळ येते. पुन्हा त्या सगळ्या आठवणी तसच मैत्री आऊट ऑफ फोकस होते. आपल्या लार्इफचच फोकस बदलून जातं आणि सगळ्या आठवणी एका बंद दारामागे लपल्या जातात!
पण आजच्या वन स्मार्ट क्लिकच्या जमान्यात सोशल नेटवर्कींग सार्इट्स, च्याट रूम अगदी बोकाळल्या आहेत. म्हणतात ना ‘चार वेगवेगळ्या जागा चार जुने मित्र एक कॉफी मग आणि एक च्याट सव्र्हर!’ पुष्कळानी हे अनुभवलं असेल कारण या वक्याचा खरा अर्थ अनुभवच सांगून देर्इल. याच नेट वरून आपले असे असंख्य जुने मित्र पुन्हा जवळ येतात आणि नवीनही बनतात. नेटवर आज अनेक ब्लॉग्ज आहेत कम्युनिटीज आहेत ज्याव्दारे आपण आपल्या विचारांच्या लोकांशी मैत्री करू शकतो. आपले हे नेट मित्र आपल्याला वेळेप्रसंगी इमोशनल सपोर्ट पण देतात. लोकं म्हणतात की असं कसं न भेटता न बोलता तुम्ही मित्र होऊ शकता. पण मैत्री करायला आणि ती टिकवायला भेटणं गरजेचं आहे असं थोडी आहे. एकमेकांवर विश्वास असला म्हणजे झालं. याच नेट मित्रांपासून सावध राहणं आवश्यक आहे. त्यांच्यावर आंधळेपणे विश्वास ठेवला तर आपल्याच जिवावर येऊ शकतं. हे टाळायला आपले डिटेल्स ऑनलार्इन देणं टाळलं पाहिजे. एस एम एस मित्र मित्रांचे मित्र हे पण अगदी हीट होतय. यांच्याशीपण जपुनच वागलं पाहिजे. आपल्या लिमिट्स ठरवून त्याप्रमाणे वागलं की झालं मग काय. जस्ट एनजॉय.
आज मी माझे रोजचे मित्र आणि माझे व्हच्र्युअल मित्र हे आपलं एक छोटसं जग झालय. पण मला सांगा मैत्री म्हणजे फक्त यांच्याशीच का? वॄध्द, अनाथ, मेंटली रिटार्डेड, अपंग यांच्याशी पण होऊ शकते ना? आज असे अनेक एन जी ओ आहेत ज्यात सगळी तरूण कार्यकर्ते आहेत. ते यांच्याशी मैत्री करतात. यात स्वार्थ नसतो की कशाची अपेक्षा नसते आणि नसतो शो ऑफ! असते फक्त मैत्रीची भावना! मैत्री ही झाडांशी होते प्राण्यांशी होते पुस्तकांशी होते आणि अभ्यासाशी देखील! फक्त आपल्या मनात मैत्रीची भावना हवी. मग करताय आपला मैत्रीचा हात पुढे.
Comments
Post a Comment