एक क्षण हवा हवासा !
मनातील सुप्त भावना अलगद उलगडणारा,
जराशीही ठेच लागताच मायेनी हात पकडणारा,
अशक्य असं वाटणाऱ्या संवेदनांना एका क्षणात आपलंसं करणारा,
फक्त शब्दच नव्हे तर अबोलाही समजणारा,
आणि हास्यालाच नव्हे तर आसवांनाही न डगमगणारा.
एन उमेदीच्या काळात पाय जमीनीत घट्ट रोवून धरणारा,
एकट्यात कधीही साथ न सोडणारा.
फक्त माझ्यासाठीच असा असलेला तो सहवास.
अचानक आनंद देऊन जाणारा असा एक सुखद आभास.
Comments
Post a Comment