साथ !


प्रश्नांचे उत्तर शोधता शोधता उत्तरांनाच प्रश्न पडले,
अनामिकतेच्या एका गर्द अंधारात कुठेतरी हरवुनच बसले. 

सोबतीचे सगळेच शब्द असे भांबावून गेले,
बघता बघता सगळेच वाक्यं अपूर्ण राहिले. 

वाक्य अपूर्ण राहणार या विचारात सगळेच परिच्छेद घाबरले,
हळु हळु मग संधर्भाचे भान कुठेतरी हरवत गेले. 

गरज होती एका अनुस्वाराची,
पण समोर सगळेच विराम वाट रोखून बसलेले !

क्रियापदाची साथ शोधता शोधता,
हिरमुसून मग ते एकटेच आपल्या काळोखात परतले. 


Comments

Popular posts from this blog

Don’t know why!

Go and Live Your Life They Said!

Odd Connect!