फिरा रे !






2010 सालच्या जून महिन्यात आम्ही मित्रांना ऐन पावसाळ्यात कोकणात जाण्याचा बेत आखला होता. जेवढी मजा तो प्लान करण्यात आली होती अगदी तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त मजा तिथे आली. सुंदर आठवणी मोहक अनुभव असलेली हया सहलीची एखादी आठवण चेहऱ्यावर एक हलकसं स्मित आणल्याशिवाय राहत नाही. हे आहेत या सहलीचे काही टिपलेले क्षण.

जबरदस्त : आम्ही सगळे उत्साहात शेगावकडे निघालो. अंगात मस्तीचं भूत होतच. मग बसमधे गाणे लावून नाचणं काय, कविता आणि गाणी एकणं काय सगळी धम्माल सुरू होती. मग आम्ही दम श राज खेळायला लागलो. मला ‘जबरदस्त’ ची आक्टिंग करायची होती. तर मग मी आधी दस ची आक्टिंग केली, मग स ला अर्ध कापायला सांगितलं, मग त करता तलवार ची आक्टिंग  मग आता स्त सांगायला अर्धा स आणि त जोडायला सांगितला. आणि आता आली खरी मजा, माझी टाळी जरा जास्तच जोरात वाजली, पण काही हरकत नव्हतं, राधिकानी बरोबर ओळखल. तर तेव्हापासून ‘जबरदस्त’ आमच्या फिरा रे मधे अती फेमस झालं आणि बाकीच्या स्लोगन्स सोबत घेतला जाउ लागला आणि विथ माय आक्षन. आक्च्युयली नं हे नीट लिहून एक्सप्लेन करणं आणि ते समजणं कठीण बट आय होप फीलींग्स पोहोचल्या असतील. आणि याचं कॉपीराइट माझ्याकडेच आहे.

प्रवासातील पहिला पाउस : खरच पावसानी आम्हाला अगदी जिवलग मित्रासारखी साथ दिली. (पण पुढे तो अगदी नालायकासारखा वागत होता, बस मधून उतरलो की सुरू व्हायचा आणि चढलो की बंद. पण हरकत नाही, त्यालाच तर आम्ही भेटायला गेलो होतो. भिजण्याचा पुरेपूर आनंद आम्ही घेतला.) औरंगाबादमधील वेरूळ लेणी नं 15 मधे असताना पावसाची एक झलक मिळाली. मग आम्ही औरंगाबादला निघालो. वाटेत मस्त पाउस सुरू झाला. सगळ्यांनाच भिजायचं होतं पण दादाला कोण म्हणणार गाडी थांबव. कोणीतरी हळूच म्हटलं गाडी थांबवा आणि आमच्या ड्रायव्हरनी लगेच गाडी थांबवली. तिथेच जवळ एक खाडी होती. मग तिथे जाउन आम्ही मस्त भिजलो. त्या वर्षीचा आमच्या सर्वांचा पहिला पाउस.

पहिला चहा : जसा अमॄताचा पहिला आंबा होता तसाच आमच्या राधिकाचा पहिला चहा पण होता या फिरा रे मधे. राधिका, गौरव, स्वप्नील आणि मी ही दुध पिणाऱ्यांची चौकडी. पण हरिहरेश्वरला आम्ही सगळे चहा प्यायलो. तो चहा फक्त पाण्याचा होता ही गोष्ट वेगळी. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे राधिकाला तेव्हापासून चहा आवडायला लागला (मला अजूनही दुधच आवडतं.)

आमच्या सारखे आम्हीच : खरच आमच्या सारखे आम्हीच. कधी स्वप्नात सुध्दा विचार नव्हता केला की मी हे सगळा करीन(मनात इच्छा होती म्हणा. पण इतक्या लवकर ती पुर्ण होर्इल वाटलं नव्हतं.) हे म्हणण्याचं कारण हे की आमच्या जवळ रेनकोट, छत्री असुनदेखील पावसात कधी वापरले नाही(ते आमच्या बॅगची शोभा वाढवत होते ना.) सॅंडल असून कधी वापरले नाहीत(बस खराब होर्इल ना.) अख्ख रत्नागिरी शहर विदाउट चप्पल तुडवलं, शेवटी शेवटी तर आम्हाला आमच्या चपलांचच ओझं होउ लागलं. स्टेट हायवे वर गाडी बिघडून थांबलेली. तर आम्ही काय करावं, गाडीवर चढून एकमेकांना त्रास देणं, रस्त्याच्या बाजूला खाली सतरंजी टाकून च्यालेंज, सत्ती लावणी खेळणं, रसना करून पिणं, आणि टायरच्या झुल्यात बसून झोके घेणं. कोकमचं सरबत असं काही पिणं की लोकांना वाटेल की जणु काही आम्ही रेड वार्इन पितोय. दुसऱ्याच्या शेतात आपलं शेत म्हणून राहणं. आणि डिस्काउटचं तर विचारायला नकोच. जवळपास सगळीकडेच. आम्ही चक्क पाच रूपयांचा पण डिस्काउट घेतला. आणि रोजचे बाराचे जोक. रात्री बारा वाजता उठुन चिवडा खाणं. कपडे वाळायची पंचार्इत. आम्हाला वाटलं की शेवटी ओले कपडे अंगावरच घालून वाळवू. आणि आंघोळीच्या गोळीची तर कमालच. जवळपास सगळयांनीच ती एकदा घेतली. रस्त्यात एखादा चढाव किंवा उतार आला तर आवाज काढणे, आमचे डायलाग, ‘हं चला रे आता वरचा ओ’(चढाव म्हणून) ‘आता खालचा ओ’(उतार म्हणून) आणि संपल्यावर ‘ओ माय गॉड’ असा सगळा भैताडपणा पण आम्ही केला. एवढच काय तर एकदा गाडीत ‘डक टेल्स’, ‘शक्तिमान’ सारख्या सगळया जुन्या सिरियल्सचे टायटल साँग म्हटले. फिरा रे या शब्दाचं आमच्यावर इतकं भारी इंप्रेशन पडलं की आम्ही प्रत्येक शब्दामागे रे लावू लागलो जसे चला रे, धावा रे, झोपा रे, आवरा रे, चढा रे, उठा रे… गाडीवर ‘प्रेस’ लिहिल्यामुळे पोलिस नाक्यांवर, नगरच्या गर्दीतून आणि पुण्याच्या अजीब रोडवर आमची सुखरूप आगेकूच तसेच आमच्या ड्रायव्हरचे पोलिसांना ठामपणे सांगणे ‘रिर्पोटर है’ हा एक मस्त अनुभव होता.




वर्थ मेंशन : सर्वात जास्त वर्थ मेंशन जर कोणी असेल तर तो आमचा ड्रायव्हर. त्यानी गाडी इतकी मस्त चालवली की कार्इ विचारूच नका. कोकणच्या रस्त्यांवर गाडी चालवणं म्हणजे काही मजाक नव्हे. सगळयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानी कोणतीही कुरकुर केली नाही. आणि गाडी मस्त होती. सगळयात प्लस पॉइण्ट म्हणजे आमच्या गाडीत चार्जींग पॉइण्ट्स आणले होते त्यांनी. सगळया सेलच्या मॉडेलकरता आणि कॅम करता पण पॉइण्ट्स होते. गाडीत कपडे वाळू घालायला दोऱ्या तर अगदी सुंदरच बांधल्या होत्या. तारळला गाडी पुर्ण रिव्हर्स मधे काढली त्यांनी कारण वळायला म्हणून मोठा रोड नाहीच ना. खरच हॅट्स ऑफ टु हिम. बस आमचं जणु काही घरच होती. त्यात किचन होतं(आमचं खायचं सामान), शू रॅक होती(मोठं पोतं), पायपोस होत(पोती तिही ढापलेली), डस्ट बिन होतं(पॉलीथीन), ड्रार्इंग प्लॅटफॉर्म होता(कपडे वाळायला दोऱ्या) . अजून काय हवं यार.

आम्ही सगळे : आम्ही सगळे ‘बारा’ या नावानी फेमस झालो होतो. राधिकाने खाण्याची जबाबदारी अगदी मस्त सांभाळली. पण काही दिवसातच तिचे डाइलॉग आम्हीच म्हणून टाकायचो, मग तिला काहीच उरायचं नाही म्हणायला. वरदा तर आम्ही सगळे शांत झाल्यावर आपलं तांडव सुरू करायची. दादाचं अमॄताला ‘चला जा आता घरी’ म्हणून चिडवणं आणि ‘मला प्लेनचं टिकिट आणून दे मग, तसही आपण प्रॉफीत मधे आहोत’ हे अमॄताचं उत्तर सगळयांना पाठ झालं होतं. पियुष तर रोजच अगदी न चुकता आपली बॅग, टॉवेल, मोबार्इल, बूट सगळ विसरून जायचा(कॅमची बॅग किंवा कॅप कधीच नाही हं.). पण काही म्हणा बंदयानी मस्त गार्इड केलं. आणि अमॄताचं मॅप रिडिंग,  हर्षदचं राधिकाची नक्कल करणं आणि गौरवचे पी जे(खासकरून चाकण बेकारय) स्वप्नीलचं सगळयांची नावं विसरणं, आणि आनंदचं शांततेनी हसणं. माझी आणि प्रणिताची न थांबणारी हसणी आणि वरदाचे कधीही न निघालेले नमकिन पॅकेट. वहिनीची आम्हा सगळया मुलींवरची चोख नजर आणि दादाची आम्हा सर्वांवर नजर. सगळ कसं अगदी वेल प्लॅंड.

अनुभव : औरंगाबाद वरुन निघताना आमची गाडी खराब झाल्यामुळे वेळापत्रक जरा बिघडले आमचे. रात्रीचे दहा वाजून गेलेले आणि रात्रीच्या जेवणाचा काही पत्ता नव्हता किवा कुठे राहण्याचा पत्ता नव्हता. दिवसभर गाडी चालवुन ड्राइवर पण थकलेले. घरून सगळ्यांनी आधीच बजावला होत की रात्रीचा प्रवास करायचा नाही. पाली ला बाप्पा जवळ थांबण्याचा अचानक निर्णय आम्ही घेतला. ते दूर असतानाच आम्ही घरी पोहचल्याचा कळवळ्. मग काय मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरुन लोणावल्यावरून पाली ला जेवायचे हॉटेल शोधत शोधत निघलो. तो रोड इतका भीतीदायक होता बापरे. अजूनही आठवण आली त घबारगुंडी उडते. वाटेत एक दिवा नाही, सगळे बार,आणि वेळ रात्रीचे ११. शेवटी मग एका बार मधून जेवण आम्ही घेतल. सगळ्या मुली बस मधे, बस बाहेर लक्ष ठेवायला ४ मुल थांबली आणि दोघ आत गेली. सगल फटफट संपवून निघू म्हटलं त तिथे प्राणिताच झाल पोट खराब. २ मुली आणि २ मूल आत गेले. १० मिनिट झाली १५ मिनिट झाली कोणी बाहेर येईनाच. मग अजुन कोणी त्यांना बघायला आत गेल. तरीही कोणीच येईना. अशी धागधुग झाली होती बापरे. काही वेळं नंतर सगळे आले आणि कोणी तरी त्याना काय घाबरवून पाठवल! एकत १२ च्या आसपास झालेले आणि लोक म्हणे या रोड वर आत्ता नका जाउ. खूप चोरी आणि किडनॅपिंग झाली आहे म्हणे इथे. जाण त भाग होता. सगळ्या देवांची नाव घेत घेत आम्ही एकदाच पाली ला पोहोचलो. तुझ्यामुळे निभावला म्हणत बाप्पला साष्टांग घातला सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी.




आमचा हा अनुभव हरिहरेश्वरचा. आमच्या रूमच्याच बाजुच्याच खानावळीत आम्ही जेवायला गेलो होतो. रात्र झालेली, सगळीकडे अंधार. फक्त घरांमधलेच दिवे काय ते लागलेले. आमच्यातील काही मुलांचं जेवण लवकर झाल्यामुळे ते रूमवर गेले. तिथे मग आम्ही सगळया मुली आणि तीन मुलं होतो. तेवढयात तिथून खूप मुलांची टोळी गेली. ती आमच्या खानावळीच्या थोडं पुढे जाउन थांबली. सगळे नुसते ओरडत होते. तेव्हा तिथे आमची इतकी सटारली म्हणून सांगू. इथे एकीचे जेवण व्हायचे होते. ते मुलं तिथे ओरडत होते. बापरे. सिरियसली थोडी भिती वाटली. आमचं गुड लक म्हणून ती मुलं तिथून गेली आणि आम्ही सगळे लगेचच आपल्या रूमवर पळालो.

पावसला आम्ही भक्त निवासात राहण्याचं ठरवलं. तिथेही घोळ झालाच. पावसला आम्ही रात्रीच पोहोचलो. वाटेत कीर्र अंधार आणि पाउस. आम्ही आश्रमाकडे जात होतो. वाटेत नदी लागली, पण ती नदी रस्त्यावरून जात होती. म्हणजे झालं कसं की रस्त्यावर नदीचं पाणी, आणि त्या पाण्यात आमची गाडी. जस्ट इमॅजिन. स्वप्नील सगळयांच्या मनात जर अजून पाउस आला तर आपला गावाशी संपर्क तुटेल आणि मग आपल्याला हेलिकॉप्टरने  नेतील असे भंकस विचार सांगून अजून घाबरवत होता. आश्रमात पोहचल्यावर आम्हाला इथे भक्त निवास नाही असे सांगितले आणि परत मागे पाठवून एक्सट्रा 4 किमी पाठवले. याप्रकारे आम्ही ती नदी पुन्हा क्रॉस केली तर सगळयांना हायसे वाटले. तिथे खरंतर भक्त निवास आश्रमाच्या अगदी मागे आहे आणि आम्ही पार्किंग मधे गाडी लावून पायी जाउ शकत होतो हे आम्हाला दुसऱ्या दिवशी कळले. त्या आश्रमाचे इनचार्ज पण भलतेच कडक होते. ज्या स्थितीत तुम्हाला खोली दिली तशीच्या तशीच वापस पाहिजे म्हणे. आम्ही बरोबर व्यवस्थित करून दिल्या त्यांना वापस, मग म्हणे तुम्ही नसत्या केल्या तर आम्ही केल्याच असत्या. काय म्हणणार.

कशेळीची तर बातच निराळी. कशेळीला जाताना आम्ही सगळ्यांनी तिथे कितीही उशीर झाला तरी पत्ते खेळू असा बेत केला होता. पण… पण कशेळीला प्रत्येकाकरता एक अख्खा सेपरेट पलंग आणि डोक्यावर पंखा बघून… झालं आम्ही सगळे लुडकलो. संपुर्ण प्रवासात प्रथमच एवढी छान व्यवस्था होती. कारण स्लीप इज मस्त ना.

सगळे अनुभव कसे जबरदस्तच होते पण तारळ कसं आयसिंग ऑन द केक होतं. तारळमधे पोहचताच तिथली बत्ती गुल. सगळ आम्ही कंदिलात करत होतो. मी आणि वरदा बाथरूम मधे एका छोट्याश्या कंदिलात भांडे मिसळत होतो. त्या छोटया कंदिलाचाच काय तो थोडा प्रकाश, बाकी पुर्ण अंधार. तर अचानक एक पांढरं काहीतरी अंगावर उडी मारतय असं वाटलं. वरदा जोरात ओरडली, तिचं पाहून मीही जोरात ओरडली. मधल्या खोलीपर्यंत आमचा आवाज गेला. मग थोडया वेळानी आम्हाला कळलं की वरदाच्या बाजूला एका शुभ्र पांढऱ्या मांजिरीनी उडी मारली होती आणि ती मांजरही ओरडली होती. बापरे. आम्ही दोघी लगेचच बाहेर पळत सुटलो. काय तो अनुभव. तारळलाच मग आम्ही पत्ते खेळलो पण अंधाराचा फायदा घेत कोणीतरी चिटींग केली. किल्वर चौरी कोणाची हा प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे. आणि तारळलाच आम्ही वहिनीचा वाढदिवस रात्री बाराला सेलिब्रेट केला होता तोही एका टॉर्चमधे.

पुण्याला केतनकडची मजाही निराळीच. मुलांचा मुलींना घाबरवण्याचा बेत होता. मी हिशोब करत बसली होते. तर तेवढयात एकानी माझ्या अंगावर एक खोटा उंदीर टाकला. मी त्याला उचललं, त्याच्याकडे पाहिलं आणि हं म्हणत बाजूला ठेउन दिलं. मग तोच उंदिर आनंदवर फेकण्यात आला. काय ओरडला यार तो खरच. बिच्चारे मुलं त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला.




खरच फिरा रे अगदीच ‘हेल डाउन अंडर’ अशी ट्रिप होती. यात अम्ही काय कमावलं, काय गमावलं, किती बिघडलो, किती सुधरलो हे माहिती नाही पण आम्ही ‘स्ट्रीट स्मार्ट’ झालो हे मात्र निश्चितच.


Comments

Popular posts from this blog

Pink Boots!

Go and Live Your Life They Said!

Don’t know why!