ए बी सी डी मैत्रीची !

Friendship Day Special Issue 2010 शिंपल्यात पाणी घालून समुद्र कधी दाखवता येत नाही, हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही, नि ळ्या भोर गगनाचा अंत कधी होत नाही, अन् नाजूक अशा मैत्रीचा उल्लेख शब्दात होत नाही . यारी, दोस्ती, मित्र, मैत्रिणी यांच्यावर असे अनेक काव्य, कथा एवढच काय तर चित्रपट देखील आहेत . याच संदर्भाचे असे असंख्य एस एम एस पण रोज येतात आणि मैत्रीदिनाला तर यांची उधाणच असते . अगदी आपलं ज्यांच्यासोबत कोल्ड वॉर असतं ते पण मेसेज पाठवतात . हे सग ळं तर ठीक आहे पण एक गोष्ट सांगा दोस्तहो साला चीज क्या है ये दोस्ती ? याचा नेमका अर्थ प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार लावतो . खरंतर मैत्रीची परिभाषा आपल्या वयानुसार बदलत जाते . आपण अगदी लहान असतो तेव्हा आपली आर्इ आपली पहिली मैत्रीण होते . आर्इसोबतच घरातील सग ळे च म्हणजे बाबा, आजी, आजोबा, काका, काकू सग ळे च मित्र बनतात . मग जस जसं आपण मोठं होतो शा ळे त जा ऊ लागतो आपले मित्र होतात आणि मग सुरू होते ही मैत्रीची गाथा . यात रूसवे फुगवे सब चलता है आणि ‘...