कोण जबाबदार? सरकार? च्छेऽ हो! आपणच!


This is one of the cover stories which we did for a special issue somewhere around the time when the scams like "Adarsh", 2G and 3G came into picture. Our main theme was about the black money stored in the Swiss banks and corruption in general. In this article, ways to spend this black money are being discussed.

February 10, 2011



देशात काहीही वार्इट घडले की आपण सरकारला जबाबदार ठरवून मोकळे होऊन जातो. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असो वा कांदा महागला असो, नक्षलवाद्यांचा प्रश्न असो वा सुरक्षिततेचा, तेल गळती असो वा पेट्रोलचा प्रश्न असो, कोणताही राजकीय प्रश्न असेल वा अत्यंत साधा प्रश्न, सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच, सरकार! ठीक आहे ना, असेल सरकार दोषी, आहेच. पण आपला पण तेवढाच दोष नाही का? आपणच तर निवडून देतो या नेत्यांना. त्यांनी दिलेली वचनं पूर्ण करावी ही अपेक्षा करणं हे चुकीचे का? जर त्यांनी दिलेली वचनं पूर्ण नाही केलीत तर पुन्हा एक ‘आदर्श’ होर्इ पर्यंत थांबायचे का? म्हणता ना सरकार मशिनरी चांगली नाही देत मग करा ना बहिष्कार. मंगल पांडेनी इंग्रज सरकार विरूध्द केला होताच ना बंड. हा सगळा इतिहास शाळेपुरताच मर्यादित आहे का? तो लक्षात ठेन त्यातून काही शिकायला नको का आपण? सगळेच पुढारी म्हणतात की अब भारत का नैतृत्व देश के युवाओं के हाथ में होगा. अरे क्या खाक होगा? आज भारतात सगळ्यात जास्त यंगस्टरर्स आहेत. म्हणजेच देशाच्या संपुर्ण लोकसंख्येमधून जवपास चाळीस टक्के लोक हे 20 ते 40 या वयोगटात आहेत. व्हिजन 2020चे स्वप्न पाहणाऱ्या या भारत देशातील यंगस्टरर्स काय करतात आहेत? इंडियाला चायना आणि यु एस ए शी कम्पेअर! किंवा एखाद्या कॉलेज कट्टयावर सरकारने असे करायला हवे होते, चायना इंडियात घुसतेय, झोपलाय का सरकार माहीत नाही इ. असे तत्वज्ञान सांगताना आढतात. किंवा एखादी पार्टी अरेंज करत आहेत. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं, एखाद्या बड्या कंपनीतील गलेल पगाराच्या नोकरीसाठी प्रयत्न! हे कुठेतरी आणि कधीतरी थांबलं पाहिजे असं नाही वाटत का तुम्हाला? आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेत तर नक्कीच बदल घडवता येतील.

भारतात काळा पैसा सगळ्यात जास्त आहे. तो का आणि कसा काय आणि कोणी आणला हे महत्त्वाचे आहेच. या काळ्या पैश्याचे काय करायचे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. काळा पैसा कमवणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाला तो कमवायचा असेल तर त्याने तो जरूर कमवावा. त्यानी स्वत:चे बँक बलन्स वाढवावे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हाच काळा पैसा थोडा देशाकरता वापरला तर. तुम्ही म्हणाल नेते त्यांच्या काळ्या पैसाचा उपयोग स्वत:पुरता करतात मग आम्ही का म्हणून असे वागावे? अरे तुमच्यात आणि त्या नेते मंडळींत काही फरक आहे की नाही? तसाही हा वरचा पैसा असल्यामुळे कोणाचेच जास्त नुकसान  नाही होणार. ही एक इनव्हेस्टमेंट राहील. इनव्हेस्टमेंट कशी विचारताय. ओके. लेट मी एक्स्प्लेन. हे बघा तुम्ही डेव्हलपमेंट करता फंडिंग कराल. डेव्हलपमेंट झालं की तुम्ही चांगलं आयुष्य जगाल, जास्त अपाच्र्युनिटीज मितील आणि भविष्य सुध्दा टेंशनफ्री असेल. आणि तुमचं नाव पण होर्इल. सगळेच म्हणतात सिस्टीम मध्ये जा आणि जो चेंज हवा असेल तो करा. त्याची इतकी गरज नाही आहे. आपल्याला जेवढं जमेल तेवढं जरी केलं तरी चालेल.  त्यातील काही करता येण्यासारख्या गोष्टी पुढे दिल्या आहेत.

फोरेन एक्सचेंज ने देशाच्या संपतीत मोठी उलाढाल होते. जेवढे जास्त एक्सचेंज तेवढे जास्त भांडवल असं याचं इक्वेशन आहे. आपल्याला हे फोरेन एक्सचेंज कसं वाढेल याकडे लक्ष द्यावे लागेल. जेवढया जास्त कंपनीज भारतात इन्व्हेस्ट करतील तेवढं हे एक्सचेंज वाढेल. आता आपण या कंपनी भारतात येण्याकरता काय करू शकतो? भारतातील अनेक लोक हे परदेशात सेटल झाले आहेत आणि त्यांच्या बुध्दीमत्तेच्या जोरावर ते कंपनीत चांगल्या हुद्यावर देखील आहेत. आपण त्यांना कॉन्टक्ट करायचा. कसा? ह्या करता आपल्याला आपल्या कॉलेजची मदत होर्इल. हे लोक कुठल्या ना कुठल्या कॉलेजचे विद्यार्थी असतीलच ना. आपण त्या कॉलेजच्या अलुमनी असोशिएशन तर्फे त्यांना कॉन्टक्ट करू शकतो. जरी आपण स्वत:च्या कॉलेज अलुमनीला कॉन्टक्ट केला तरी चालेल. एकाच कॉलेजचे म्हटल्यावर कोपरेशन पण मिळे.

एक सोल्युशन म्हणजे ग्रुप बनवणे आणि एका कॉजवर काम करणे. या ग्रुपकरता आपण पैसा लावू शकतो.  समविचारी लोकांनी एकत्र येन काम केलं तर ते जास्त प्रोडक्टीव्ह असतं. म्हणतात डेव्हलपमेंट म्हणजे तळागाळातील लोकांचा विकास. बालिका वधू, ना आना इस देस मेरी लाडो किंवा प्रतिग्याचं शूटींग करायला गावांत जाता येतं तर गावांत विकास करायला नक्कीच जाता येतं. गावांमध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात येते. मक्झीमम वेला अभियानाच्या कालाविधीतच गावात स्वच्छता असते पण बाकीच्या वेळी? गावात निदान या अभिनयामुळे स्वच्छता तर होते पण शहरांचं काय? शहरातील लोक हे मुनसिपालिटीचं काम म्हणून हात उभे करतात. पण जसं ‘नो पार्किंग’ मध्ये गाडया पार्क होतात अगदी तसंच ‘येथे कचरा टाकू नये’ जिथे लिहिलं असेल तिथे हमखास कचरा दिसेल तसेच ‘येथे थुंकू नका’च्या खाली लाल पिचकार्या असायलाच हव्या. कचरा करणे मग तो बागेत असो, रस्त्यावर असो, घरात असो, फार्इव्ह स्टार हॉटेल मध्ये असो वा माउंट एव्हरेस्टवर असो वा रस्त्यावर, भिंतींच्या कोपऱ्यात लाल पिचकाऱ्या उडवणे हा आमचा जन्मसिध्द हक्क असल्यासारखे आपण वागतो. आपण एक चॉकलेट विकत घेतो आणि त्याचं कवर कुठे जातं? डस्टबिन मध्ये? च्छे हो. सर रस्त्यावर. टिश्यू पेपर, चिप्सचं पोकेट, आर्इस क्रीमचा कागद सगळ्यांचे स्थान रस्त्यावरच. हे बरोबर आहे का? गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दिवाळी सारखे मोठे सण यांच्यात खूप कचरा जमा होतो. आपण ग्रुप बनवून या कचऱ्याचे नियोजन केले तर? मग भारतही सगळ्यात स्वच्छ देश बनेल.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य शिक्षण. शिक्षण असेल तरच दो बूंद जिंदगीचं महत्त्व समजेल. सरकारनी केलेल्या योजना, सामाजिक हक्क, कायदा सग कळे. माणसाला स्वत:चा विकास करता येर्इल. लहान मुलांना शिक्षणाची ओढ असते, त्यांच्यात क्युरिओसिटी असते. त्या करता शाळा असतात. पण त्या सगळ्याच गावांत किंवा सगळ्यांपार्यंत पोहचतातच असं नाही. लोकांना फक्त शिक्षण मिळावं हेच अपेक्षित नसून त्यांनी जबाबदार व जागृत बनावं हे अपेक्षित आहे. त्यांना नवीन टेकनॉलजी माहिती हवी, बँकिंग माहिती हवं आणि रोजचे व्हवहार जागरूकपणे करता यायला हवे. सध्या ‘वन मन बँक’ हा एक नवीन कन्सेप्ट आहे. यात एक माणूस प्रत्येकाच्या घरी जार्इल आणि लोकं आपले सगळे व्हवहार घर बसल्या करू शकतील.

अवेअरनेस ग्रुप पण बनवता येतील. हे ग्रुप लोकांचे स्वास्थ्य सुध्दा बघतील. लोकांना विविध रोगांबद्दल तसेच आजारांबद्दल माहिती देतील तसेच त्यांना मदत करतील. अजुन एक निग्लेक्टेड क्षेत्र म्हणजे रेड अलर्ट एरिया. या एरियातील स्त्रीयांचा विकास नको का करायला? आफ्टर ल दे आर ल्सो ह्युमन बिर्इंग्ज. त्यांना आपण नेहमी तुछ्य नजरेनेच पाहतो. त्यांनी का बरं असे जगावे? त्यांचे हक्क कुठे गेले? त्यांना सावत्र ट्रिटमेंट का? गुन्हा काय आहे त्यांचा? आवड म्हणून थोडी आल्या आहेत त्या या धंदयात. त्यांचं रिह्याबिलिटेशन हे झालच पाहिजे.

तुम्हाला ज्या क्षेत्रात इंट्रेस्ट असेल त्या क्षेत्रासाठी तुम्ही काम करू शकता आणि आपला ग्रुप बनवू शकता. ग्रुप बनवायचा नसेल तर कोणत्या ग्रुपला जॉर्इन हो शकता आणि मदत करू शकता. ‘मेक अ डिफरंस’, ‘झीरो ग्राव्हिटी’, ‘अलग अँगल’ हे नागपूरातील काही असे सोशल गु्रप्स आहेत.

इट इस नॉट नेसेसरी की तुम्ही गु्रप बनवा. जर तुम्ही चांगले आरकिटेक्ट किंवा इंजिनिअर किंवा एक चांगले न्ट्रेप्रिनर असाल तर या काळ्या पैसातून तुम्ही आपली कंपनी सुध्दा काढू शकता. तुम्ही आपली एक कंसलटंसी फर्म देखील सुरू करू शकता. इट इज लवेज अप्रिशिएटेड अज फार अज इट इस फॉर अ गुद कॉ. सो उठा. सरकारला शिव्या देत बसू नका. क्यु की हमारी मुठ्ठी में है आकाश सारा और हमारी जान में है दम…!



Comments

Popular posts from this blog

Pink Boots!

Go and Live Your Life They Said!

Don’t know why!