एकदा तरी जगावं!




वाटतं आता कुठेतरी थांबावं,
बंधनांचे पाश तोडून दोन सेकंद तरी जगावं.

अथांग अश्या समुद्रात स्वतःला झोकून द्यावं,
कुणी म्हणेल पागल का तं त्याला पण त्या आनंदात अलगत खेचावं.

दूर अश्या क्षितीजाला थेट बिलगाव,
त्या यशाच्या आनंदात एकदम धूत व्हावं.

कोणास तरी आपल्या हक्काचं बनवावं,
हळूच प्रेमाच्या पदरात चिंब चिंब भिजावं.

लहरी अश्या मनाचा ताबा एकदा तरी सुटावा,
ज्याने आयुष्यात सुंदर असा एखाद अनुभव तरी असावा.

वेळ आली तर साऱ्या जगास ओरडून सांगाव 
नि रडावं वाटल्यास एका मित्राच्या खांद्यावर भोकाड उघडावं.

किर्र अश्या अंधारात जंगलात एकट भटकावं,
कशाची हि परवा न करता तसेच पुढे चालत रहावं.

दोस्ताच्या पार्टीत रात्रभर नाचावं,
थकलेल्या जीवाला मग दिवसभर झोपू द्यावं.

पोकेट मधला शेवटचा पैसा संपेपर्यंत खर्च करावा,
रिकामा झाल्यास पायीच घरी परतावं.

आपल्या आवडत्या कामात मनापासून वेडे व्हावं,
त्यामुळे जर जाईल जगाचे भान तरी ते बेस असावं.

कोणी जर जात असेल डोक्यात फार,
तं त्याला तिथेच मुस्काटात द्यावं,
आयुष्यात एकदा तरी विल्लन होऊन बघावं.

दुसऱ्याचा विचार न करता फक्त आपल्या मनाचं ऐकावं.

नेहमीच लोकांसाठी नव्हे तर एकदा तरी स्वतःसाठी जगावं.


Comments

Popular posts from this blog

Don’t know why!

Odd Connect!

We Still Miss Her!