मृगजळ




मृगजळ असमंतामध्ये , वेडे मन घेई धाव त्याकडे !
कळेना त्यास , त्यात आहेत फक्त खोट्या माया ,
कोण समजावेल त्याला स्वप्नभंग राहणारच ढगाआड !

अश्याच एका रिंगणात अडकलेली मी ,
भावनांच्या पेचात कोणास ठाऊक कधी गुंतले मी !

मनात कल्लोळ , डोक्यात विचार , निघून आले बरंच लांब ,
बघत होती वादळ शमण्याची वाट , जशी चातकास असते पावसाची वाट !

लक्षातच आले नाही मला ,
भरतीच्या वेळी अथांग समुद्रात मदतीला येतात क्वचितच हात !

मुळात नसतेच कोणी सारखे , जसे हातावरची बोटं पाच ,
पुढचे पायुल कुठे टाकायचे कोण ठरवेल आपल्यापेक्षा अजून छान !

स्वतःमध्येच एवढे गुरफटत गेले मी ,
विसरूनच गेले की प्रत्येक जण झुंजत असतो आपल्या मृगजळासह स्तब्धपणे ,

मुळात एकटी नाहीच मी !

Comments

Popular posts from this blog

Pink Boots!

Go and Live Your Life They Said!

Don’t know why!