सखी !

 
जेव्हा आठवणी आणि भावना अनावर होतात,
तेव्हाच आठवणीत येतेस तू.
 
प्रश्नांची तारांबळ, उत्तरांचे कुतुहल जेव्हा भांबावतात,
तेव्हाच वाटतं नजरेसमोर असावीस तू.
 
अशी कशी अचानक स्वार्थी होते मी,
इतर क्षणी निष्क्रिय असते मी?
 
कदाचित ठाऊक असते मनास,
हाकेच्या अंतरावर असतेस तू!
 
म्हणून कदाचित घ्रुहितच धरल्या जातेस तू!
 
 
 

Comments

Popular posts from this blog

बंधन !

Game On!

Sand Timer!